हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध ठरतंय धोकादायक; आयसीएमआरनेही दिले महत्वाचे निर्देश 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. मात्र, सध्या कोरोना सारखे विषाणूजन्य आजार होऊ नये म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

मुंबई ः जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. मात्र, सध्या कोरोना सारखे विषाणूजन्य आजार होऊ नये म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या औषधांचा सर्वांत मोठा उत्पादक देश असलेल्या भारताकडे अनेक देशांनी मागणी नोंदवली. अगदी हायड्रोक्सीक्लोरिक्वीन औषधांच्या पुरवठ्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंधही ताणल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे औषध म्हणून वापर होणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरिक्वीन औषधाबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा इशारा दिला आहे. 

मोठी बातमी ः कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

हायड्रोक्सीक्लोरिक्वीन औषधाच्या सेवनामुळे हृदयावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केला आहे. शिवाय, मलेरियावरील या औषधामुळे कोरोना रूग्णाच्या आरोग्याला धोका असतो.  लान्सेट या जर्नलमध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासानुसार, जगभरातील सहा खंडांतील 96 हजार रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसिन रिसर्चने प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या आणि डॉक्टरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे औषध प्रायोगिक तत्वावर द्यावे, असे घोषित केले होते; मात्र आता याबाबत नवा खुलासा समोर आला असून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना रुग्णांसाठी वापरु नये, असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. 

मोठी बातमी ः शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

पूर्वी पहिल्या दिवशी प्रायोगिक तत्वावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या 2 गोळ्या, त्यानंतर एक-एक असे तीन आठवडे या गोळ्या दिल्या जात होत्या. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोनावर चमत्कारिक औषध असल्याचे जाहीर केले आणि या औषधाचा वापर सरसकट केला गेला; मात्र त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार न करता कोणीही या गोळ्यांचे सेवन करत होते. लोकांनी त्याचा गैरवापर करत चुकीचे डोस घेतले. आपल्या इथेही या गोळ्यांचा परिणाम म्हणून काहींना उलट्या आणि पोटदुखी अशा समस्या जाणवल्या. लान्सेट या जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सर्व खंडांमधील 96 हजार रुग्णांची तपासणी केली गेली. यातुन असे लक्षात आले की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनमुळे ह्रदयाचे ठोके कमी जास्त किंवा अनियमित पडतात. हृदयाची हालचाल आणि पम्पिंग प्रक्रियेवर परिणाम होतो.

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

मृत्यूचे प्रमाण 35 ते 40 टक्के 
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध मलेरियासाठी दिले जाते. पण याचा वापर कोरोना रुग्णांवर ही केला जात होता. त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाण 35 ते 40 टक्के आहे. तसेच मलेरियाविरोधी हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि अँटीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमायसिन यांसारख्या औषधांचा 'कोव्हिड-19 'वर उपचार दिले तर 45 ते 55 टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो असे ही लान्सेट जर्नलमध्ये सांगण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये आणखी एका प्रसिध्द केलेलया सर्वेतही अशी माहिती देण्यात आली आहे. 

मोठी बातमी ः बॉलिवूडला आणखी एक धक्का; कर्करोगाने झाले तरुण अभिनेत्याचे निधन...

आयसीएमआरने मलेरियाविरोधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून वापरु नये, असे जाहीर केले आहे. लान्सेट या जर्नलमध्येही याबाबत माहिती देण्यात आली आहे. यातून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. 
- अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hydroxychloroquine medicine badly affects on hearts, icmr issues not to use