जंबो कोविड केंद्रातील ICU विभाग अधिक सक्षम होणार,40 तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणार

जंबो कोविड केंद्रातील ICU विभाग अधिक सक्षम होणार,40 तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणार

मुंबई: मुंबईतल्या जंबो कोविड केंद्रावर खासगी हॉस्पीटलमधील नामांकित डॉक्टरांची नियुक्ती केल्यानंतर पालिका प्रशासनाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. अनेक कोविड केंद्रातील अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. या पदासाठी जाहिरात काढण्यात आली असून या पदाला दोन लाख दहा हजारापर्यंत मोबदला मिळणार आहे.

नेस्को,बीकेसी, मुलूंड आणि महालक्ष्मी रेस कोर्स इथल्या जंबो कोविड केंद्रात 40 तज्ज्ञ डॉक्टरांची लवकरच नियुक्ती होणार आहे. या पदासाठी इतर राज्यातील डॉक्टरही अर्ज करु शकतात. या चारही कोविड केंद्रात गंभीर रुग्णांवर उपचाराची अत्याधुनिक व्यवस्था आहे. मात्र अतिदक्षता विभागात अजूनही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. या केंद्रातील मृत्यूदर कमी करणे आणि आयसीयू विभाग अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. 

मुंबई, नवी मुंबईत आयसीयू खाटासह सुसज्ज जंबो केंद्र उभारली गेली आहेत. इतर शहरातील जंबो कोविड केंद्रातील सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारींच्या तुलनेत या केंद्राबद्दल तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई अलिकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे  पालिकेने जंबो केंद्रात 250 अतिरिक्त आयसीयू खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कोविड केंद्रात खाजगी रुग्णांलयातील मुंबईच्या विविध खाजगी हॉस्पिटलमधील  30 नामांकित डॉक्टर्स आपली सेवा देत आहेत.

-------

(संपादनः पूजा विचारे) 

ICU department Jumbo Covid Center efficient 40 specialist doctors appointed

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com