
मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबईतही या व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मुंबई कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी पालिकेनं अनेक उपाययोजना आखल्या. दररोज पालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. याचसाठी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेनं एक योजना आणली आहे.
एखाद्या महापालिका कर्मचाऱ्याचा सेवेत असताना कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी यासंदर्भातली माहिती दिली.
मोठी बातमी - मुंबईत शाळांचे ऑनलाईन वर्ग 15 जूनपासून?
1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर अवघ्या दहा दिवसांत ही योजना तयार करून ती लागू करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
असे असतील भरपाईचे निकष
कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या होण्यापूर्वी 14 दिवसांच्या कालावधीमध्ये कामावर हजर असणे आवश्यक असेल.
ज्या प्रकरणांमध्ये कोरोनाची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये पालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करून अंतिम निर्णय घेईल.
कामगार, कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या वारसांना भरपाईसाठी विविध दस्ताऐवजांसह अर्ज दाखल करावा लागेल.
अर्जासोबत मृत कामगार, कर्मचारी यांचे ओळखपत्र, दावाकर्त्याचा ओळख पुरावा, मृत आणि दावाकर्ता यांच्यातील नातेसंबंधांचा पुरावा यांची प्रमाणित प्रत, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा प्रयोगशाळेचा अहवालाची प्रमाणित प्रत जोडावी लागेल.
कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे, रोजंदारी, मानसेवी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी, कामगार यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित खाते प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
सामाजिक संस्था, कंत्राटदार यांच्यामार्फत नियुक्ती झाली असल्यास त्या कामाची वर्कमॅन कॉम्पेनसेशन पॉलिसी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, ईएसआय योजना आदींची प्रमाणित प्रत देखील द्यावी लागणार आहे.
if any bmc employee dies due to covid19 bmc will give 5o lakh to their family
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.