ट्रेनमध्ये प्रत्येकाने मास्क वापरले तर संसर्ग पसरण्याची भिती 99 टक्क्यांनी होते कमी - वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

भाग्यश्री भुवड
Saturday, 31 October 2020

अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांच्या मते, पहिले पाऊल म्हणून ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जातील. ज्यामुळे सध्या होणारी गर्दी आणखी कमी करता येईल. 

मुंबई : जर ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येकाने मास्क लावला तर कोरोना संसर्गाची भीती 99 टक्क्यांनी कमी होते असे मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या मुंबईतील कोविड रुग्णांचा जो आलेख आहे तो उतरु लागला आहे. त्यामुळे सरकारने सरसकट सर्वांसाठी ट्रेनचा प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

तद्य डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाहेर फिरताना सोशल डिस्टंसिंग नियम पाळले तरच या महामारीसोबत लढायला सोपे होईल. सध्याच्या परिस्थितीत आढळणाऱ्या केसेसमध्ये आणखी कमतरता आली तर पुढच्या दोन आठवड्यात ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देणे सोपे होईल. मात्र, कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही तर ही परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते अशीही भीती व्यक्त केली जातेय. 

लोकांची जबाबदारी महत्वाची - 

सर्व सूत्र हे लोकांच्या हातात आहेत. जर लोकांनी ठरवले तर त्या वाढत्या केसेसवर नियंत्रण मिळवू शकतात. मात्र त्याविरोधात जर त्यांनी बेफिकिरपणा केला, मास्क लावला लावला तर ही परिस्थिती हाताबाहेर ही जाऊ शकते असं  टास्क फोर्स समिती सदस्य डॉक्टर शशांक शशांक जोशी यांनी म्हटलंय. 

महत्त्वाची बातमी : राज्यपाल विरुद्ध राज्य, पुन्हा वाद पेटण्याची शक्यता; आमदार नियुक्तीसाठी कडक नियम?

सोशल वॅक्सीन म्हणजेच फेस मास्क वापरणे, 1 मीटरपर्यंत सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझर आणि हॅन्डवॉशचा वापर करणे हीच कोरोनावरील सध्याची लस आहे. तर  दुसरीकडे ट्रेनमधील गर्दी पाहता तिथे सोशल डिस्टंसिंग पाळणे सोपे होणार नाही त्यामुळे किमान मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे सर्व मास्क लावत असतील तर संसर्ग पसरण्याचा धोका 99 टक्क्यांपर्यंत कमी होतो असे ही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांच्या मते, पहिले पाऊल म्हणून ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जातील. ज्यामुळे सध्या होणारी गर्दी आणखी कमी करता येईल. 

दरम्यान, लोकांची गर्दी आणि लोकांचे वागणे बघून इतर सुविधाही सुरु करता येतील असेही डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे. अधिकारी ही वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील ट्रेन या एसी लोकल नसल्यामुळे तिथे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे असे पालिकेच्या एका डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

महत्त्वाची बातमी : लोकल स्टेशन्सवर गर्दी होऊ नये म्हणून सरकारचा मास्टरप्लॅन, कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई-पास व्यवस्थेवर अभ्यास

मुंबईकरांमध्ये अजून एक विशेष बाब आहे जी संसर्ग रोखण्यासाठी मदत करेल. या आधी ही लोकांनी व्हायरससोबत सामना केला आहे. पालिकेने केलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, न्यूयॉर्क शहरासारखीच मुंबईतील बऱ्याचशा लोकांमध्ये उच्च दर्जाच्या कोविड 19 विरोधातील अँटीबाॅडीज तयार झाल्या आहेत. मुंबईच्या 30 टक्के लोकांमध्ये ही अँटीबॉडीज आढळून आल्या असतील. शिवाय, इतर अनेक लोकांचा या व्हायरसशी सामना झालेला असेल तर संसर्गाचा धोका हा कमी असू शकतो. फक्त या व्हायरसचा संसर्ग घरातील ज्येष्ठ नागरिकांना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

( संपादन - सुमित बागुल )

if everyone wears mask in local trains then covid transmission will decrease by 99 percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if everyone wears mask in local trains then covid transmission will decrease by 99 percent