IIT मुंबईचा चिंता वाढवणारा अहवाल; मुंबईची वाटचाल तिसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने?

IIT मुंबईचा चिंता वाढवणारा अहवाल; मुंबईची वाटचाल तिसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने?

मुंबई : 22 : कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केला आहे. मात्र, करोनाशी लढण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नसून तातडीने चाचण्या, रुग्ण शोधणे आणि विलगीकरण याचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे आयआयटी मुंबईच्या समितीने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच लॉकडाउन उठवल्यावर रुग्ण संख्या वाढण्याची भीतीही समितीने व्यक्त केली आहे.

आयआयटी मुंबई आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी गांधीनगर, आयसीएमआर आणि विश्व भारती विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘ससंर्ग जन्य आजाराची बहुद्देशीय चिकित्सा’ करणारा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल 36 जणांच्या चमूने विविध स्तरावर अभ्यास करून तयार केला आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. जर पूर्ण दोन महिने लॉकडाउन सुरू राहिले तर देशाला सुमारे 1,65,000 कोटींचे नुकसान नुकसान सहन करावे लागेल. तर तीन आठवड्यांच्या लॉकडाउनमध्ये मजुरांचा सुमारे 58 हजार कोटी इतका रोजगार कमी झाला आहे. 

केरळ पॅटर्नचे कौतुक

केरळमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मात्र तेथील चांगल्या सामाजिक स्थितीमुळे हे राज्य सर्वाधिक रुग्णांना बरे करू शकले आहे. याबद्दल या अहवालात केरळचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच देशातील काही भाग सध्या अति धोक्याच्या स्तरावर असून येत्या काळात त्यांचा धोका अधिक वाढेल असाही अंदाज बांधला आहे.

शास्त्रज्ञांचाही अहवाल

कोरोनाविरोधी लढ्यात विविध गट आपल्या स्तरावरून मदत करत आहेत. यात सुमारे 400 शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रिस्पॉन्स टू कोव्हिड-19 या टीमनेही या संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय मॉडेल तयार केले आहे. त्यांनीही लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.

आयआयटी अहवालातील निरीक्षणे

  • लॉकडाउन उठवल्यावरही काही रुग्ण राहतील ज्यांच्यामुळे साथ पुन्हा पसरू शकते. 
  • चाचण्यांची संख्या वाढवून, विलगीकरण करणाऱ्यांची संख्या वाढवून, रुग्णांचा शोध घेऊन महामारीवर नियंत्रण आणावे लागेल. 
  • लॉकडाउनच्या कालावधीत कडक शिस्त पाळणे आवश्यक
  • अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी टप्याटप्याने लॉकडाउन शिथील करणे. 
  • 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात जीडीपीच्या 3.46 टक्के नुकसान अपेक्षित आहे. तर दोन महिन्यांच्या कालावधीत जीडीपीच्या 12 टक्के नुकसान होणार आहे. 
  • महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना त्यांच्या जीडीपी 47 टक्के इतके मोठे नुसाकन होण्याचा अंदाज आहे.

if lockdown is rolled out then are we marching towards lockdown extension for third time

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com