esakal | मुंबईकरांनो...; तुम्ही कोरोनाच्या 'या' स्टेजमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Corona mumbai

मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावाने अद्याप दुसरा टप्पा ओलांडलेला नाही, असे महापालिकेने सांगितले आहे. त्यासाठी 97 विशेष दवाखान्यांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबईकरांनो...; तुम्ही कोरोनाच्या 'या' स्टेजमध्ये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावाने अद्याप दुसरा टप्पा ओलांडलेला नाही, असे महापालिकेने सांगितले आहे. त्यासाठी 97 विशेष दवाखान्यांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

मोठी बातमी : काळजी घ्या ठाणेकरांनो! शहारातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार

मुंबई महापालिकेने आतापर्यंत 434 ठिकाणे सील केली असून, तेथे 97 विशेष दवाखाने (फीवर क्‍लिनिक) सुरू केले आहेत. त्या ठिकाणी 3585 जणांची प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे. कोरोनासदृश लक्षणे दिसलेल्या 912 व्यक्तींची थ्रोट स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यापैकी फक्त पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सामाजिक म्हणजे तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलेला नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. 

महत्वाची बातमी मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी

कोरोना रुग्ण आढळलेले परिसर सील केला जातो. रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन करून कोरोना चाचण्या केल्या जातात. त्यांना "हाय रिस्क कॉंटक्‍ट' असे म्हटले जाते. महापालिकेने अशा 2000 जणांना क्वारंटाईन केले असून, 6000 "लो रिस्क' संपर्कांवर नजर ठेवली आहे.

नक्की वाचाखबरदार.. प्रक्षोभक व्हिडिओ पोस्ट कराल तर थेट तुरुंगात..

पाच दिवसांनी तपासणी 
क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी तत्काळ केली जात होती. परंतु, त्यातून विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे महापालिकेने आता क्वारंटाईन केल्यानंतर पाच दिवसांनी चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर पाच-सहा दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

mumbai is in second stage of corona, read stroy in detail

loading image
go to top