काय सांगता ! इथं आधारकार्ड दाखवल्यावरच दारु मिळते, वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

भिवंडी तालुक्यात मद्याची दुकाने उघडण्यास अधिकृत परवानगी नसतानाही दारू विक्रीची दुकाने सर्रास उघडण्यात आली आहेत.आजुबाजूच्या शहरांमध्ये मद्याची दुकाने बंद असल्याने कोंडी झालेले मद्यप्रेमींची मोठी गर्दी याठिकाणी होत आहे.

भिवंडी :  भिवंडी तालुक्यात मद्याची दुकाने उघडण्यास अधिकृत परवानगी नसतानाही दारू विक्रीची दुकाने सर्रास उघडण्यात आली आहेत.आजुबाजूच्या शहरांमध्ये मद्याची दुकाने बंद असल्याने कोंडी झालेले मद्यप्रेमींची मोठी गर्दी याठिकाणी होत आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी आधारकार्ड आणल्या शिवाय दारू मिळणार नाही, अशी भूमिका काही दारू विक्रेत्यांनी घेतल्यामुळे अनेक तळीरामांना हात हलवत परत जावे लागले आहे. तर आधारकार्ड असलेल्या नागरिकांबरोबर महिला वर्गाही सकाळपासून दारू घेण्यासाठी दुकानाबाहेर गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. 

ही बातमी वाचली का? मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार; राज्य सरकारचा निर्णय

भिवंडी ग्रामीण भागात मद्याची दुकाने गेल्या पाच दिवसांपासून उघडण्यात आली आहेत. भिवंडी तालुक्यासह शहापूर, ठाणे, कल्याण, वाडा, वसई भागातील मद्यप्रेमीही याठिकाणी मद्य खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने अनेक ग्रामस्थांनी हरकत घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग व तहसीलदार कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने ही दुकाने सुरळीतपणे सुरू आहेत. 

ही बातमी वाचली का? रायगडमध्ये हे आहेत 38 नवे तारणहार

गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिसांनाही नाकीनऊ येत असल्याने यावर उपाय म्हणून दुकानदारांनी ज्या ग्राहकाकडे आधारकार्ड असेल त्यालाच दारू दिली जाईल अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दारूसाठी बाहेरील तालुक्यातून आलेल्या नागरिकांना हात हलवत परत जावे लागले. तर अनेकांकडे आधारकार्ड असल्याने त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत दारू घेण्यासाठी गर्दी करत असल्याने स्थानिक नागरिकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

If you want alcohol, bring Aadhaar card, crowd in Bhiwandi village


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you want alcohol, bring Aadhaar card, crowd in Bhiwandi village