भिवंडीत तीन किलो गांजासह दोन तलवारी जप्त,आरोपी अटकेत

भिवंडीत तीन किलो गांजासह दोन तलवारी जप्त,आरोपी अटकेत

मुंबईः  भिवंडी शहरात पोलिसांनी तीन किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तलवारीही हस्तगत केल्या. सध्या भिवंडी शहरात अंमली पदार्थांचा व्यवसाय  फैलावलात चालला आहे. त्यामुळे  ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलिस आयुक्त संजय ऐनपुरे, पोलिस उपाआयुक्त  लक्ष्मीकांत पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी आपल्या पोलिस पथकासह शांतीनगर गायत्रीनगर भागात साएका घरात छापा टाकल्या. या छापेमारीत सुमारे तीन किलो 250 गांजा आणि दोन तलवारी हस्तगत केल्यात. तसंच या कारवाईत आरोपीलाही अटक केली आहे.  सुमारे 98 हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईने अंमली पदार्थ विक्रीतील आरोपींमध्ये खळबळ माजली आहे. गुन्हे शाखेच्या अशोक होनमाने यांना गुप्त माहिती मिळाली.  शांतीनगर भागातील गायत्री नगर येथे राहणाऱ्या रिजवान खुर्शीद खान ( 24 )च्या  घरात गुन्हा करण्याचा इराद्याने प्राणघातक शस्त्र आणि मादक अंमली पदार्थ ठेवण्यात आला आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. 

या गुप्त माहितीच्या आधारे,  त्यांनी पोलिस उप निरीक्षक शरद बरकडे, सहाय्यक पोलिस रामसिंग चव्हाण, दिलीप शिरसाठ पाटील या पोलिस पथकासह संशयितांच्या घरी छापा मारला. त्याच्या घरात छापा मारला असता दोन धारदार तलवारी आढळून आल्याने घराची कसून झडती घेतली. त्यानंतर घरात 3 किलो 250 ग्रॅम वजनाचा 98 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Illegal herbs 3 kg seized with Two cannabis Bhiwandi accused arrested

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com