

Mumbai Weather
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही भागात परतीचा पाऊस बरसत असला तरीही मुंबई शहरासह उपनगरात उकाड्यात वाढ होत आहे. परिणामी मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून पुढील ७२ तास मुंबईत आणखी उकाडा पसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.