

Mumbai Rain Alert
ESakal
मुंबई : मुंबईकरांना आता उन्हाच्या चटक्यासोबतच पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार, ३१ मार्च ते २ एप्रिल या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.