Mumbai Rain Update: जाणून घ्या मुंबईतल्या पावसाचे लेटेस्ट अपडेट

पूजा विचारे
Friday, 21 August 2020

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पाऊस सक्रिय आहे. आजही सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

मुंबईः गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पाऊस सक्रिय आहे. आजही सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर भागात अधून-मधून पासाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तसंच आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्हात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

हेही वाचाः  मुंबईतील जैन मंदिरं 'या' दिवशी उघडणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बाप्पांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना पावसानं झोडपून काढलं आहे. मागील काही तासांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. 

अधिक वाचाः  सुशांत सिंह राजपूत प्रकरणः शिवसेनेवर गंभीर आरोप करत नितेश राणे CBIला करणार 'ही' विनंती

तसंच गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसणार असून, त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातही अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे.

IMD predicts heavy rainfall mumbai thane palghar ganesh charturti


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMD predicts heavy rainfall mumbai thane palghar ganesh charturti