#Lockdown : ‘फॅशनेबल दाढी’ असलेल्यांचे वांदे

File Photo
File Photo

डोंबिवली : एकेकाळी क्लिन शेव आणि गुळगुळीत गाल ठेवणारे तरुण आता पिळदार मिशीसोबत साजेशी दाढी ठेवत आहे.  सध्या  मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र सलून बंद आहेत. त्यामुळे दाढी ठेवणाऱ्या सामान्य युवकांपासून ते अगदी लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वांचेच वांदे झाले आहेत. चेहरा अधिक आकर्षक दिसण्यासाठी सलून सारखी दाढी घरी करता येणे शक्य नसल्याचे तरुण सांगत आहेत. त्यामुळे दाढी म्हणजे "स्टाईल स्टेटमेंट" असल्याने त्यावर प्रयोग करण्यासाठी खास वेळ काढून सलून गाठणारी मुले कोरीव दाढीअभावी सोशल मीडियावर नवीन फोटोच टाकणे बंद केल्याचे दिसून येते. 

मॉडेलिंग,  डान्स,  व्यावसायिक, महाविद्यालययीन तरुण,  युवा लोकप्रतिनिधी आजकाल कोरीव दाढी ठेवून अधिक आकर्षक लूक यावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. विशेषतः लाईट बिअर्ड,  वर्दी बिअर्ड,  बाल्बो, चीन स्ट्रीप, थिक बिअर्ड,  स्टबल,  गोटी विथ फ्रेंच मुशस्टाच अशी विविध आकारातील दाढी सलून अभावी करणे युवकांना अशक्य झाले आहे. त्यातच आजकाल मुलींनाही क्लीन शेव्ह असणाऱ्या मुलांपेक्षा  दाढीमधील रुबाबदार व भारदस्त मुलं आकर्षित करत आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत सलून बंद असल्याने युवकांना कोरीव दाढीतला भारदस्त व रुबाबदार असा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन हजारो लाईक्सचा पाऊस पाडण्याचे मनसुबे पूर्ण करता येत नाही आहेत.

दाढी ठेवणे हा मुलांच्या जणू प्रतिष्ठेचाच प्रश्न झाला आहे. दाढीला परिपूर्ण आकार हा सलून मध्येच देता येतो. घरी केलेले प्रयत्न अनेकदा फसतात.

- सागर पाटील, बदलापूर

The impact of a closed saloon

अनेकांसाठी युवकांना "दाढी है तो सबकुछ है" असे अनेक वाटते. मात्र ही दाढी देखील स्टायलिश आणि रेखीव असायला हवी. सध्या मात्र संचारबंदीमुळे हे शक्य नसल्याने अनेकांनी घरी क्लीन शेव केली आहे. मात्र दाढी ज्यांच्यासाठी व्यक्तीमत्वाची शान आहे ते मात्र दाढी आहे तशीच ठेवून आहेत. त्यांनी सोशल मीडियावर नवे फोटो टाकणे मात्र कमी केले आहे.

-  महेश बनकर, कल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com