LIC गृहकर्ज घेतलंय, जाणून घ्या तीन हप्त्यांबाबत LIC ने ग्राहकांना काय पर्याय दिलेत

LIC गृहकर्ज घेतलंय, जाणून घ्या तीन हप्त्यांबाबत LIC ने ग्राहकांना काय पर्याय दिलेत

मुंबई : एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जासह कंपन्यांच्या कर्जाचेही तीन हप्ते पुढे ढकलण्याबाबत त्यांच्या ग्राहकांना पर्याय दिला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार कर्जांच्या परतफेडीचे तीन हप्ते पुढे ढकलण्याबाबत एलआयसी हाऊसिंग फायनान्स ने त्यांच्या ग्राहकांना विचारणा केली आहे. त्यानुसार तीन महिने हप्ते पुढे ढकलायचे असतील तर एलआयसी हाऊसिंग फायनान्सला तसे कळवणे ग्राहकांवर बंधनकारक आहे. ग्राहकांनी काहीही न कळवल्यास नेहमीप्रमाणेच कर्जफेडीचा हप्ता कापला जाईल. 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीसाठी ही सवलत आहे. 

LIC फायनान्सने त्यांच्या ग्राहकांना लघुसंदेश पाठवून हा पर्याय दिला आहे. त्यांच्या www.lichousing.com या वेबसाईटवर ग्राहकांना याबाबत तपशीलवार माहिती मिळू शकते. आर्थिक अडचणी असलेले सामान्य कर्जदार तसेच कंपन्या यांना या सवलतीचा लाभ मिळू शकेल. नेहमी ज्या तारखेला कर्जफेडीचा हप्ता कापला जातो, त्याच्या तीन दिवस आधी या वेबसाईटवर आपल्याला ही सवलत हवी आहे, असे ग्राहकांनी कळवावे लागेल.

अन्यथा consent@lichousing.com येथे इ मेल करून ही सवलत हवी असल्याचे कळवावे लागेल. तीन महिन्यांचे हप्ते माफ होणार नसून फक्त त्यांची वसुली पुढे ढकलली जाणार असल्याने त्या कालावधीचे व्याजही भरावे लागेल. ते नंतर एकरकमी देता येईल किंवा ती रक्कम कर्जाच्या उरलेल्या रकमेत मिळवून कर्जफेडीचा कालावधी त्यानुसार वाढवला जाईल.

तीन महिन्यांची सवलत घेत असल्याचे कळवतानाच व्याज कशा प्रकारे फेडणार तो पर्याय देखील कळवायचा आहे. कंपन्यांच्या कर्जाच्या पर्यायाबाबत कंपन्या किंवा फर्मच्या मान्यताप्रत प्रतिनिधीने आपला पर्याय कळवायचा आहे, असेही एलआयसीच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

important announcement by LIC housing finance about emi moratorium step by step process

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com