esakal | ... म्हणून नागोठणे शहराला मिळणार दिलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सवासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली. या वेळी मार्गदर्शन करतांना मान्यवर.

आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या वेळी नागरिकांना विशेष काळजी व दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

... म्हणून नागोठणे शहराला मिळणार दिलासा 

sakal_logo
By
अमित गवळे

पाली : आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या वेळी नागरिकांना विशेष काळजी व दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील आरोग्य धोरणांबाबत बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

हे वाचा : डॉक्टरला धमकावणे महागात

जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या पुढाकाराने आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सवा संदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. या वेळी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि किशोर जैन यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. 

 हे वाचा : सुशांतचा मृतदेह पाहून रिया म्हणाली

गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अनेक नागरिक शहरात आले आहेत. नागोठणे शहर हे मुंबई, गोवा महामार्गावर असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने नागरिकांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी असे या वेळी सांगण्यात आले. रिलायन्सने वेलशेत येथे स्थापन केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये रिलायन्स कंपनीकडून सहकार्य करण्यात येत नाही अशी तक्रार जैन यांनी केली. कंपनीच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. तसेच आरोग्य विषयक धोरणासंदर्भात तातडीने नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात येईल, असे किशोर जैन यांनी सांगितले. 
बैठकीस सरपंच मिलिंद धात्रक, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्नेहल कोळी, मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, ज्ञानेश्वर साळुंखे आदी उपस्थित होते. 
.................... 
 
 

loading image