esakal | डाॅक्टरला धमकावणे पडले महागात! मास्क न घालताच गर्दी केल्याने महिलेविरोधात गुन्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅक्टरांना धमकावणे पडले महागात! मास्क न घालताच गर्दी केल्याने महिलेविरोधात गुन्हा...

रुग्णाभोवती गर्दी करू नका. मास्क घाला, असे समजावणाऱ्या डॉक्टरलाच शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅक्टरला धमकावणे पडले महागात! मास्क न घालताच गर्दी केल्याने महिलेविरोधात गुन्हा...

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई :  रुग्णाभोवती गर्दी करू नका. मास्क घाला, असे समजावणाऱ्या डॉक्टरलाच शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  या महिलेसोबत 22 सदस्यांनी रुग्णालयात गर्दी केल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? पालघर साधू हत्याकांडातील आरोपींसाठी सरसावली 'ही' संघटना; न्यायालयात वकीलपत्र सादर!

डॉ. कविता तिवानी त्यांच्या भावासोबत ग्रँट रोड येथे एस.पी. नर्सिंग होम चालवतात. आठ महिन्यांची गरोदर असलेल्या फैजमा शेख यांना 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. 18 ऑगस्ट रोजी त्यांची प्रसुती करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी त्यांना पाहण्यासाठी 22 नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. त्यातील काहींनी मास्क घातले नव्हते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी शेख यांची वैद्यकीय पाहणी करण्यासाठी डॉ. कविता तेथे आल्या. यादरम्यान तीन महिला रुग्णाच्या खाटेवर बसल्या होत्या. त्यांनी मास्कही घातले नव्हते. त्यावर डॉक्टर कविता यांनी आक्षेप घेत नातेवाईकांना मास्क घालण्यास व रुममधून बाहेर जाण्यास सांगितले. 

ही बातमी वाचली का? खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई महापालिकेविरुद्ध थोपटले दंड

यावेळी शेख यांच्या शेजारी बसलेल्या नफिसा अब्बास लोखंडवाला या महिलेने धमकावून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर इतर नातेवाईकांनी वाद घालण्यास सुरूवात केली. रुग्णालयातील इतर कर्मचा-यांनी मध्यस्थी करून नातवाईकांना रुममधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. कविता यांनी डी. बी. मार्ग पोलिसांत तक्रार केली. त्यानूसार पोलिसांनी याप्रकरणी नफिसा लोखंडवाला यांच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम 2010 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image
go to top