esakal | डोंबिवली : बेशिस्त रिक्षाचालकांना RTO चा दणका
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : बेशिस्त रिक्षाचालकांना RTO चा दणका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीमध्ये उप प्रादेशिक परिवहन विभाग, कल्याण व वाहतूक विभाग डोंबिवली (Dombivali) यांच्या वतीने शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात करवाई करण्यात येत आहे. गणवेश न घालणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहतूक नियम मोडणे आदी कारणांवरून ही कारवाई करण्यात येत आहे.

डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २०० हून अधिक रिक्षाचालकांवर करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांची दंड वसुली करण्यात आली आहे. परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण आणि डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारपासून डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहनतळावरील रिक्षाचालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा: कोल्हापूरकरांनो वाहतूक नियम मोडणे पडणार महागात....

तपासणीमध्ये अनेक रिक्षाचालकांच्या परवान्यांची तारीख उलटली तरी नूतनीकरण करून घेतलेले नाही, अनेक जण गणवेश वापरत नाहीत तर काहींनी भाड्याने रिक्षा चालविण्यास घेतली, मात्र त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत, अशा रिक्षाचालकांना कारवाई करण्यात आली असून अडीच लाखांच्या आसपास दंड वसुली करण्यात आली | असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गित्ते यांनी दिली. तसेच रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, असे सांगितले. बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top