esakal | ठाण्यात १९७ मुले तीव्र कुपोषित
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यात १९७ मुले तीव्र कुपोषित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहरी (City) भागासह ग्रामीण भागात शासनाच्या वतीने कुपोषणाचे , बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कुपोषित (Malnourished) बालकांचे श्रेणीवर्धन करण्याचे काम ठाणे (Thane) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण (Child welfare) विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच या विभागाकडून या बालकांचे शंभर टक्के श्रेणीबदल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असले, तरी आजही जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या १९७ इतकी असून मध्यम कुपोषित बालकांची संख्या दोन हजार ७३ इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कुपोषणाचा विळखा आजही कायम असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. अनेकदा नागरिक मजुरीच्या कामासाठी स्थलांतरित होत असल्याने त्यांचे त्यांच्या बालकांकडे दुर्लक्ष होत असते. तसेच स्त्रियांमधील आहारातील उष्मांक आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येत असतात. त्यामुळे गरोदरपणात त्या महिलांना पोषक असा आहार मिळणेदेखील गरजेचे असते. मात्र त्या मातांनादेखील पुरेसा पोषण आहार मिळत नाही.

बालके जन्मानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले होणे आवश्यक आहे. मात्र त्या काळात त्या मातेला पोषक व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे बालक कुपोषणाच्या विळख्यात अडकते. विविध योजना असूनही अपेक्षित यश येत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण 92 टक्के

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक सॅम बालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच कुपोषणाबाबत जनजागृती केल्याने दृष्टिकोन बदलण्यास मदत होत आहे. त्यामुळे सॅम श्रेणीतील बालकांचा शंभर टक्के श्रेणीबदल होत आहे.

- संतोष भोसले, महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे

loading image
go to top