Loksabha News: वर्षा गायकवाड लढणार उत्तर मध्य मुंबई लोकसभेची जागा? तर भाजपकडून 'या' नावाची चर्चा

सलग तीन वेळा या मतदार संघावर त्यांनी कॉग्रेसचे वर्चस्व कायम ठेवले |He maintained the supremacy of the Congress in this constituency three times in a row
Loksabha News: वर्षा गायकवाड लढणार उत्तर मध्य मुंबई लोकसभेची जागा? तर भाजपकडून 'या' नावाची चर्चा

Loksabha: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा या पक्षांनी अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. या दोन्ही पक्षांचा उमेदवार अजूनही ठरत नाही. त्यामुळे येथील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसमध्ये आता वर्षा गायकवाड यांच्या नावाची तर भाजपातर्फे पराग अळवणी यांच्या नावाची नव्याने चर्चा सुरू आहे.

या लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ येतात. मुंबईचे फुफ्फुस असलेले आरेचे जंगल, वर्सोवा समुद्र किनारा, गोरेगाव फिल्मसिटी या मतदार संघात येते.अभिनेते सुनील दत्त यांनी हा मतदार संघ कॉग्रेसकडे कायम ठेवला होता. 1984 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले.(Constituencies include Jogeshwari East, Dindoshi, Goregaon, Versova, Andheri West and Andheri East.)

Loksabha News: वर्षा गायकवाड लढणार उत्तर मध्य मुंबई लोकसभेची जागा? तर भाजपकडून 'या' नावाची चर्चा
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नागपूर लोकसभेची निवडणूक गाजवणार? | Sakal Loksabha Diary

सलग तीन वेळा या मतदार संघावर त्यांनी कॉग्रेसचे वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या निधनानंतर २००५ मध्ये या मतदार संघातून त्यांची मुलगी प्रिया दत्त निवडून आल्या. गेल्या निवडणूकीत या मतदार संघातून भाजपाच्या पूनम महाजन विजयी झाल्या. मोदी लाटेचा फायदा त्यांना झाला, आता यावेळी पुनम महाजन यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे भाजपाने उमेदवारांचा शोध सुरु केला आहे.(In 2005, his daughter Priya Dutt was elected from this constituency)

Loksabha News: वर्षा गायकवाड लढणार उत्तर मध्य मुंबई लोकसभेची जागा? तर भाजपकडून 'या' नावाची चर्चा
Nanded Loksabha Constituency : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत

भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपाचा सुरू होता. मात्र शेलार यांनी लढण्यास नकार दिला. भाजपा उमेदवार शोध घेत असून आता पराग अळवणी याच्या नावाची भाजपामध्ये चर्चा सुरू झाली आहे. वर्षा गायकवाड यांच्या नावाची येथून कॉंग्रेसमध्ये सुरू आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने दक्षिण मध्य मुंबईवर दावा केल्याने त्या जागी अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे.(BJP was thinking of giving candidature to BJP President Ashish Shelar)

त्यामुळे आता कॉंग्रेस वर्षा गायकवाड यांच्या नावाची उत्तर मध्य मुंबईतून विचार करीत आहे, या जागेसाठी कॉंग्रेसमधून नसीम खान , भाई जगताप यांच्या नावाचीही चर्चा आहे. कॉंग्रेस आणि भाजपामधून कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडे आता या मतदार संघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.(The names of Naseem Khan and Bhai Jagtap from Congress are also being discussed for this seat)

Loksabha News: वर्षा गायकवाड लढणार उत्तर मध्य मुंबई लोकसभेची जागा? तर भाजपकडून 'या' नावाची चर्चा
Lok Sabha 2024 : 'आंबेडकरी पक्ष एका बाजूला, समाज दुसऱ्या बाजूला'; ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांचं मत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com