मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट महागले; उद्यापासून द्यावे लागणार 'इतके'' रूपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

increase in railway platform ticket prices in mumbai by central railway check details

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : रेल्वे प्रशासनाने आपत्कालिन काळात चेन खेचण्याच्या घटना घडतात. यामध्ये बरेच जण कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढतात. त्यामुळे मुंबईत अशा घटनांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते, दररम्यान अशा घटना रोखण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ही दरवाढ उद्यापासून म्हणजेच ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं पुढील १५ दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत येणाऱ्या मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.