

Mumbai First Mangrove Park
ESakal
मुंबई : बोरिवलीतील गोराई येथे देशातील पहिले शहरी खारफुटी उद्यान तयार झाले आहे. ते डिसेंबरमध्ये जनतेसाठी खुले केले जाईल. मुंबईच्या ५० किमीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटी होती. गोराईसह दहिसरमध्ये खारफुटी उद्यानाची भेट मुंबईकरांना मिळणार आहे. गोराई येथील ८ हेक्टरच्या मॅन्ग्रोव्हज पार्कमध्ये मॅन्ग्रोव्ह ट्रेल, बर्ड ऑब्झर्व्हेटरी आणि कायाक ट्रेल आहे.