"अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी" | Varsha Gaikwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

"अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी"

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : भारतीय संविधान (Indian constitution) हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना (students) लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य समजण्यासाठी (understanding values) शालेय अभ्यासक्रमामध्ये (School Syllabus) त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिले.

हेही वाचा: BMC : डोंगराळ भागात पाणी पोहोचवण्यासाठी योजना; वाचा सविस्तर

शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागामार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने आज सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येऊन याबाबतचा आढावा घेण्यात आला.

यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर (ऑनलाईन) उपस्थित होते.

हेही वाचा: मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून मूल्यवर्धन अभ्यासक्रमांतर्गत विविध उपक्रमांद्वारे संविधानिक मूल्य शिकविली जातात. तथापि विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये, स्वातंत्र्य, एकता, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसह भारतीय संविधानाची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्यांचे वय विचारात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये याबाबींचा सविस्तर समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण आयुक्त आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सारासार चर्चा करून तातडीने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top