डोंबिवलीतील शाळेच्या जुन्या आठवणींना दिला अजिंक्य रहाणेनी उजाळा

इन्स्टावरील त्याच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती
Ajinkya rahane
Ajinkya rahanesakal media

डोंबिवली : मूळचा डोंबिवलीकर व आता मुंबईत राहणार भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नुकताच डोंबिवलीत येऊन गेला. डोंबिवलीतील (dombivali sv joshi school) त्याची शाळा एस. व्ही. जोशी हायस्कुलला भेट देत त्याने त्याविषयीचा व्हिडीओ बुधवारी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर (Instagram) पोस्ट केला आहे. शाळेतील (old memorable memories) जुन्या आठवणींना त्याने यावेळी उजाळा दिला.

Ajinkya rahane
नवी मुंबईत महिला असुरक्षित; दर दोन दिवसांत एका महिलेवर बलात्कार

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे डोंबिवलीमध्ये पत्नी राधिका व मुलगी आर्या सोबत आला होता. यावेळी त्याने डोंबिवली तील त्याची शाळा एस.व्ही. जोशी हायस्कूलला भेट दिली. या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत त्याने क्रिकेटचे धडे देखील गिरवण्यास सुरुवात केली होती. शाळेची ओळख आणि काही जुन्या आठवणी अजिंक्यने व्हिडीओ च्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. अजिंक्यच्या या व्हिडिओला त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत, तसंच कमेंटही करत आहेत.

'खूप वर्षांपासून मला इकडे यायचं होतं, आज यायचा योग आला. इकडूनच मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. शाळेने मला पाठिंबा दिला. शाळेमध्ये आता खूप बदल झाले आहेत, पण इकडे येणं खूप स्पेशल आहे,' असं अजिंक्यने सांगितले. तसेच ठिकाण कितीही बदललं असलं तरी माझ्या मनात या ठिकाणाबद्दल तीच जागा आहे,' असं कॅप्शन रहाणेने तो व्हिडिओ पोस्ट करताना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com