'या' कंपनीचा रिषभ पंत झाला ब्रॅंड ऍम्बेसेडर 

file
file


मुंबई : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याची देशातील अग्रगण्य स्टील निर्माता जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचा ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली आहे.

उच्च प्रतीची उत्पादने बनविणे आणि संपूर्ण भारतातील ग्राहकांना ती सहजपणे उपलब्ध होतील याची खात्री करण्यावर आमचे लक्ष आहे. जी आम्हाला आधुनिक भारत तयार करण्यास संधी उपलब्ध करून देते. एक ब्रॅंड म्हणून तरुण, निर्भिड आणि जागतिक दर्जाचे आम्ही आहोत. हीच लक्षणे रिषभ पंतमध्ये दिसतात. रिषभ पंत याला आमचा ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून निवडताना आम्हाला आनंद झाला आहे आणि ही भागीदारी फायदेशीर ठरेल. जेएसडब्ल्यू निओस्टील आणि जेएसडब्ल्यू कलरॉन+ ब्रॅंड चांगला स्मरणात राहील यात शंका नाही, असे जेएसडब्ल्यू ग्रुपचे पार्थ जिंदल यांनी म्हटले आहे.


भारतीय अर्थकारणाची वृद्धी लक्षात घेता भारतील प्रमुख अर्थव्यवस्थेतील उद्योगक्षेत्रांना चालना देत बांधकाम, रियल इस्टेट, भांडवली वस्तू, वाहन उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रांतील पायाभूत विकासात महत्त्वपूर्ण वृद्धीचा अंदाज आहे. जेएसडब्ल्यू स्टीलचे ध्येय हे भारताच्या विकास गाथेत महत्त्वाची भूमिका बजावायचे आहे. आर्थिक वर्ष 30 पर्यंत 45 एमटीपीएचा टप्पा गाठण्याच्या दृष्टीने जेएसडब्ल्यू स्टीलने क्षमता विकास प्रकल्पांची मालिका हाती घेतली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 


जेएसडब्ल्यू स्टीलसोबतच्या या सहयोगाविषयी बोलताना भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत म्हणाला की, जेएसडब्ल्यू स्टीलसमवेत भागीदारीविषयी फार आनंदी आहे. ही एका दीर्घकालीन आणि उत्साही सहयोगाची सुरुवात आहे असे मला मनापासून वाटते. मी जेएसडब्ल्यू स्टीलसारख्या एका जागतिक दर्जाच्या कंपनीचा सहयोगी झालो आहे. या कंपनीचा नेतृत्व प्रवास, कल्पक उत्पादने आणि भविष्याकरिता सुसज्ज क्षमतांचे मी कायमच कौतुक वाटत आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com