ट्रेनमध्ये मोबाइलवर मोठ्याने बोलणं व गाणी ऐकणं पडणार महागात!

वाचा रेल्वेची नवी नियमावली
local train
local trainesakal

मुंबई : ट्रेनमधून प्रवास करताय? पण आता मोठमोठ्याने मोबाईलवर बोलणं व लाऊडस्पीकरवर गाणी लावणार असाल तर थांबा... कारण भारतीय रेल्वेने (indian railway) नवी नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये काही नवे नियम लागू केलेत. जाणून घ्या सविस्तर..

बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय

रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा काही गोष्टी आपल्या नजरेस पडतात. बऱ्याच वेळेस सहप्रवासी जोरजोरात फोनवर बोलत किंवा स्पीकरवर गाणी ऐकत असल्याचा अनुभव येतो. पण यापुढे आता अशा बेशिस्त प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. कारण रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने नवी नियमावली प्रसिद्ध केली असून रेल्वे प्रशासनाने मात्र प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे.

local train
मुंबईतील ताडदेवमध्ये इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू, 18 जखमी

भारतीय रेल्वेची नवी नियमावली

प्रवासी आपल्या फोनवर जोरात बोलणार नाही किंवा स्पीकरवर मोठ्याने गाणी ऐकणार नाहीत

तिकीट तपासनीस, रेल्वे कर्मचारी प्रवाशांना त्यांच्या फोनवर मोठ्याने न बोलण्याबद्दल सल्ला देतील.

रात्री १० नंतर ट्रेनमधील रात्रीची लाईट वगळता इतर सर्व लाईट बंद कराव्यात

एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रवाशांनी तक्रारी केल्यास अशा प्रवाशांवर कारवाई केली जाईल.

६० वर्षांवरील, दिव्यांग, एकट्या महिला प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सर्व आवश्यक मदत दिली जावी.

local train
ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरुजींवर शिक्षण विभागाकडून कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com