

Mumbai Local News
esakal
मुंबई: महिलांसाठी राखीव असलेल्या रेल्वे डब्यात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर आता २,५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांनुसार महिलांच्या डब्यातील अनधिकृत प्रवेश, विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये बेकायदा प्रवेश, निर्धारित अंतरापेक्षा अधिक प्रवास तसेच तिकिटाच्या गैरवापराविरोधातील कारवाई कठोर करण्यात आली आहे.