
मुंबई विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला आग लागली. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनल टी-१ वर घडली. विमानातून प्रवाशांना टर्मिनलवर घेऊन जाणाऱ्या इंडिगो प्रवासी बसच्या पुढच्या भागाला आग लागली. विमानतळाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि काही वेळातच आग विझवण्यात आली.