शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन नामंजूर; विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय.. 

सुनीता महामुणकर 
Wednesday, 15 July 2020

शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने आज नामंजूर केला आहे.

मुंबई : शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने आज नामंजूर केला आहे.

कोविड 19 च्या साथीमुळे कारागृहात संसर्गाची भीती आहे, त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी इंद्राणीच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या जे सी जगदाळे यांनी बुधवारी अर्ज नामंजूर केला.

हेही वाचा; अरे वाह! मुंबईच्या 'या' ठिकाणाला मिळणार अटलबिहारी वाजपेयींचं नाव; उर्वरित विस्तारही होणार वेगात

आतापर्यंत तीने चारवेळा जामीनासाठी अर्ज केला आहे. हे चारही अर्ज नामंजूर झाले आहेत. याशिवाय तपासाच्या कारणावरूनही जामीन अर्ज केला असून तो प्रलंबित आहे. 

ज्या प्रकारे सध्या कोरोना साथ सुरू आहे ते पाहता खटला किंवा प्रलंबित जामीन अर्जांवर कधी सुनावणी होईल याची माहिती नाही, त्यामुळे आता तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली होती. मागील पाच वर्षांपासून ती भायखळा कारागृहात आहे. 

हेही वाचा: "चेस द व्हायरस"! मीरा भाईंदर शहराचा कोरोना नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार

शीना तिची मुलगी होती आणि मालमत्तेचे वादातून इंद्राणीने आधी पती आणि वाहन चालकाच्या मदतीने शीनाची हत्या केली असा आरोप सीबीआयने केला आहे. शीनाचा मृतदेह रायगडमधील जंगलात सन 2012 मध्ये टाकण्यात आला होता. मात्र तीन वर्षानंतर अन्य एका प्रकरणाच्या तपासात हे हत्याकांड उघड झाले होते.

संपादन : अथर्व महांकाळ 

indrani mukharjees Bail denied by CBI special court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indrani mukharjees Bail denied by CBI special court