
नेरळ : कर्जत तालुक्यात अंगणवाडी केंद्रातील बालके, गर्भवती आणि स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेतून पोषण आहार दिला जातो; मात्र पोषण आहाराची मागील बिले थकली असून मागील दोन महिन्यांपासून पोषण आहार देणे बंद करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारकडून येणारा आहार स्थानिक यंत्रणेकडून नियमाप्रमाणे राबविली जात नाही. त्यामुळे अंगणवाडीमधील बालकांनाही अतिरिक्त पोषण आहाराला मुकावे लागत असल्याचे दिशा केंद्र या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी सांगितले.
कर्जत तालुका आदिवासी बहुल तालुका असून आदिवासी भागातील अंगणवाडी हद्दीत येणारी बालके, गर्भवती तसेच स्तनदा माता यांना सरकारकडून अतिरिक्त आहार देण्यात येतो. डॉ अबदुल कलाम अमृत पोषण आहार योजनेच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो; मात्र या योजनेवर नियंत्रण असलेल्या रायगड जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने आदिवासी भागातील 89 अंगणवाड्यांना येणारा पोषण आहार दोन महिने बंद होता. योजना चालविण्यासाठी येणाऱ्या खर्च कोणी द्यायचा असा प्रश्न त्यावेळी समोर आल्याने अमृत आहार योजनेची बिले तब्बल दोन महिने थकल्याने योजनाच बंद होती. त्याचा परिणाम स्तनदा माता व गर्भवती महिलांना होत आहे. तसेच कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या बालकांना देखील पोषण आहार मिळाला नसल्याने परिसरांत कुपोषण वाढलेल्याचे दिसून येते. कर्जत तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या आरोग्य केंद्रापैकी खंडास, कळंब, आंबिवली या तीन ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक आदिवासी बहुल भाग आहे. हे सर्व लक्षात घेऊन शासनाने अमृत आहार योजना सुरु केली; मात्र त्या योजनेची बिले तालुका आणि जिल्हा स्तरावर थकली आहेत.
संस्थेला सरकारने समन्वयक म्हणून नेमले आहे. त्यामुळे कार्यकर्ते सतत पाठपुरावा घेतात; मात्र बिले मिळाली नसल्याने अंगणवाडीमधून पोषण आहार देणे बंद झाले आहे. हि बाब लक्षात येताच माहिती घेतली असता त्यातील सत्यता लक्षात आली. त्यामुळे बंद पडलेला अतिरिक्त पोषण आहार लवकर सुरु करुन कुपोषण कसे रोखता येईल, याकडे लक्ष आहे.
- अशोक जंगले, कार्यकर्ता, दिशा केंद्र आणि अमृत आहार योजना जिल्हा समन्वयक
Infants, pregnant, lactating mothers are deprived of nutritious food Amrut Ahar Yojana bills exhausted in Karjat taluka
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.