Mumbai Metro : अश्विनी भिडेंकडून मेट्रो ३ च्या स्थानकाची पाहणी

मरोळ नाका आणि एमआयडीसी स्थानकांना दिली भेट
Inspection of Metro 3 station Ashwini Bhide Marol Naka and MIDC stations mumbai
Inspection of Metro 3 station Ashwini Bhide Marol Naka and MIDC stations mumbaisakal

मुंबई : मुंबई मेट्रो ३ चे काम प्रगतीपथावर असून यापैकी पहिल्या टप्प्याचे काम ८७ टक्के पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील ७६.८ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण मेट्रो ३ प्रकल्पाचे एकूण ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

मुंबई मेट्रो ३चा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो ३ चे काम वेगाने सुरु आहे. मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशने दिलेल्या माहितीनुसार,मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसीचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेडचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

स्थानकांच्या उभारणीचे कामही सध्या अंतिम टप्प्यात आहे. याच कामाच्या प्रगतीचा आढावा नुकताच मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी भिडे यांनी 'मरोळ नाका' आणि एमआयडीसी स्थानकांना भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी अश्विनी भिडे यांच्या समवेत स्थापत्य विभागाचे कार्यकारी संचालक सी.एम.जाधव,सिग्नलिंग आणि दूरसंचार कार्यकारी संचालक राजीव कुमार ,विद्युत विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रफुल्ल वाघ होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com