esakal | शहापुरात इको सेन्सिटिव्ह झोनला प्रखर विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शहापुरात इको सेन्सिटिव्ह झोनला प्रखर विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खर्डी : पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तानसा अभयारण्य क्षेत्रातील १४५ गावांतील ६२५.३०० चौरस किलोमीटर क्षेत्र अतिसंवेदनशील 'इको-सेन्सिटिव्ह झोन' म्हणून संरक्षित करण्याचा निर्णय केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे; मात्र या अभयारण्यासभोवतालचे क्षेत्र १०० मीटरपर्यंत मर्यादित ठेवावे, अशी मागणी बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

शहापूर वन विभागात ३२८.७७५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्राच्या परिघापासून एक किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या बांधकामांना मनाई करण्यात येणार आहे. या झोनला विरोध करत एक हजार सह्यांचे निवेदन सेवानिवृत्त वनाधिकारी किशोर ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतेच शहापूर उपवनसंरक्षकांकडे देण्यात आले. या वेळी अॅड. निखिल खाडे, किरण सोकांडे, दिलीप अधिकारी, जितेश विशे, एकनाथ वेखंडे, विवेक निमसे, रवींद्र विशे, मनोहर ठाकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पर्यावरण रक्षणासाठी महिलाशक्तीचा जागर

११४५ गावांचा समावेश प्रस्तावित 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये शहापूरसह आसनगाव, चेरपोली, कांबारे, दहागाव, खर्डी, आटगावसह ६२ गावे, वाडा विभागातील ५८, तर भिवंडीच्या १५ व मोखाड्यातील १० अशा १४५ गावांचा समावेश आहे.

loading image
go to top