राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर

सुमित बागुल
Monday, 28 September 2020

कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे बंधू आहेत. कप्तान मलिक हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच वादग्रस्त ठरतात.

मुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अधोरेखीत झालाा आहे.

अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी कॉग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी नगरसेवक कप्तान मलिक यांची सुधार समिती सदस्यपदी नियुक्ती करण्याचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले होते. मात्र, पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी कप्तान मलिक यांच्या जागी मनिषा रहाटे यांची नियुक्ती करण्याचे पत्र महापौरांना दिले. महापालिकेच्या नियमानुसार गटनेत्यांच्या पत्राआधारे आज मनिषा रहाटे यांची नियुक्ती महासभेत जाहीर करण्यात आली.

कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे बंधू आहेत. कप्तान मलिक हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच वादग्रस्त ठरतात. तसेच राखी जाधव आणि कप्तान मलिक यांचे फारसे पटतही नाही. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह कधीच उघड झाले नव्हते . मात्र, या नियुक्तीच्या निमीत्ताने हे वाद चव्हाट्यावर आले आहेत.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

समित्यांच्या सदस्यपदी नव्या नियुक्ती मार्च महिन्यात करण्यात येतात. मात्र,यंदा कोविड मुळे 5 महिने विलंबाने या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. महासभेत आज या सर्व पक्षीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तर, पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत.

स्विकृत नगरसेवक पहिल्यांदाच स्थायी समितीत 

महापालिकेच्या वैधानिक समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती आज महासभेत जाहीर करण्यात आली. स्थायी समितीवर भाजप कडून भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिलसाट हे स्विकृत सदस्य आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारे स्विकृत सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. शिरसाट हे अभ्यासू असून त्यांनी गटनेते म्हणूनही काम पाहिले आहे. स्थायी समितीत शिवसेनेला घेरण्यासाठी शिरसाट यांच्याबरोबर उज्वला मोडक या जेष्ट नगरसेविकेचीही भाजपने नियुक्ती केली आहे.

महत्त्वाची बातमी :  राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण; सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाईन

कनाल यांना पुन्हा संधी 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेच्या कोअर समितीचे सदस्य राहूल कनाल यांना शिक्षण समितीत पुन्हा संधी देण्यात आली आहे. कनाल यांची शिक्षण समितीच्या स्विकृत सदस्यपदी शिवसेनेकडून फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

internal conflicts of nationalist congress party reviled for the first time


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: internal conflicts of nationalist congress party reviled for the first time