कोरोनामुळे भारतीय मसाल्याला चांगला भाव, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी

कोरोनामुळे भारतीय मसाल्याला चांगला भाव, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी

मुंबई: कोरोनामुळे भारतीय मसाल्यांच्या मागणीत वाढ झाली असून वेलची, हळद, मिरपूड, लसूणला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. जगभरात कोरोनानंतर मसाल्यांच्या निर्यातीत डॉलरच्या तुलनेत 2 टक्के आणि रुपयांच्या तुलनेत 34 टक्के वाढ झाल्याचा अहवाल असोचॅमने नुकताच प्रसिद्ध केला आहे. 

उत्तम रोगप्रतिकारक शक्ती हेच कोरोनाला रोखण्याचे प्रमुख शस्त्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांचा कल रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या उत्पादनांकडे वाढू लागला. आयुर्वेदिक काढ्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वेगाने वाढण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाल्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच काढ्याचे सेवन करू लागले. यातूनच भारतीय मसाल्यांचे महत्त्व अधोरेखित होऊन त्यांच्या मागणीत वाढ झाली. भारतीय मसाल्यांची ही जादू जागतिक स्तरावरही पसरली असून, जगभरातूनही भारतीय मसाल्यांच्या  मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

जगभरातील नागरिकांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणे, आरोग्य सुरक्षित ठेवण्यामध्ये अधिक रस निर्माण झाला आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून, मिरपूड, लसूण, कोरडे आले आणि हळदीच्या विक्रीत वाढ झाली आहे. याशिवाय काळी मिरी, लसूण, कोरडे आले, हळद, हिंग, मेथी, वेलची, जायफळ, कोथिंबीर आणि मिरचीच्या मागणीत वाढ झाली आहे.

मिरचीची सर्वाधिक निर्यात

2020 मध्ये ‘असोचॅम’मध्ये सादर झालेल्या अहवालानुसार, जगभरात  कोरोनानंतर मसाल्यांच्या निर्यातीत डॉलरच्या तुलनेत 23 टक्के आणि रुपयांच्या तुलनेत 34 टक्के वाढ झाली आहे. 2020 या आर्थिक वर्षात मिरची सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे.  या बरोबरच जिरे पाठोपाठ, हळद तिसर्‍या क्रमांकावर आहे.  मे 2020 पासून निर्यातीत वाढ झाली असून ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री झाल्याने वेलची उत्पादकांकडून अधिक चांगल्या किंमतीची नोंद झाली आहे. लिलावाच्या किंमतींमध्ये निर्यातीत वाढ होत  चाललेल्या  किंमतीत 600 रुपयांची वाढ झाली. वेलची प्रति किलो सरासरी 1615 रुपये भाव मिळाला. मेपासून आतापर्यंत सुमारे 25 टन किंमतीची सुमारे 100 टन वेलची सौदीला निर्यात करण्यात आली आहे. याचा भारतीय बाजारपेठेवर नक्कीच चांगला परिणाम दिसत असून, भारताचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत मिळाली आहे.

हळद, तुळस आणि किसलेले आले हे सर्वोत्तम प्रतिकारक आहे. दमा, खोकला, सर्दी आणि जठरोगविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आलं वापरले जाते. लसूण खाल्याने सर्दी कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मिरपूडीमुळे रक्तसंचय आणि सायनसमध्ये आराम मिळतो. डांग्या खोकल्याच्या उपचारामध्ये आणि योग्य पचनासाठी हिंग गुणकारी  ठरते.  मेथी, मध आणि लिंबाचा बनलेला हर्बल चहा हा ताप आणि खोकल्यावर रामबाण ठरतो. मेथी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. वेलचीच्या सेवनाने फुफ्फुसांना थेट किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभावित करू शकणार्‍या कोणत्याही विषाणूंच्या संक्रमणास प्रतिबंधित करण्यास मदत होते. धनिया पावडर अन्नाच्या पचनासाठी गुणकारी ठरतात. घशाच्या दुखण्यावर मिरचीचा उपचार गुणकारी ठरतो.

मसाल्यांची लागवड आणि निर्यात ही 200 वर्षांहून अधिक काळ भारताची मुख्य ताकद होती. भारतीय खाद्य हे नेहमीच मसाल्यांनी तयार केले जाते. मसाल्याच्या वापरामुळे जगाच्या तुलनेत आपण प्रतिकारशक्तीत कसे भिन्न आहोत हे दिसून येते. काही मसाले  व्यवसायासाठी आणि मानवजातीसाठी प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी वरदान आहेत, असे  इंटरलिंक मार्केटिंग कन्सल्टन्सी प्रा. लि.  संचालक डॉ. राजा स्मार्त यांनी सांगितले.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

International Market Increases demand for Indian spices because of Corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com