दहावीचा पेपर देऊन आला, त्याच्या डोळ्यात घुसली लोखंडी सळई!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

घाटकोपर (पश्‍चिम) येथील कातोडीपाडा परिसरात मलनिस्सारण वाहिनीच्या बांधकामानिमित्त उघड्यावर असलेल्या लोखंडी सळ्या डोळ्यात घुसल्याने दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळच्या सुमारास घडली.

मुंबई : घाटकोपर (पश्‍चिम) येथील कातोडीपाडा परिसरात मलनिस्सारण वाहिनीच्या बांधकामानिमित्त उघड्यावर असलेल्या लोखंडी सळ्या डोळ्यात घुसल्याने दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळच्या सुमारास घडली.

ही बातमी वाचली का? बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; पाहा काय असेल बदल...

विवेक आनंद घडशी (वय १५) असे जखमी तरुणाचे नाव असून तो सध्या दहावीची परीक्षा देत आहे. मराठीचा पहिला पेपर झाल्यानंतर शुक्रवारी हिंदी विषयाचा दुसरा पेपर होता. त्यानिमित्त विवेक गुरुवारी अभ्यासासाठी मित्राकडे सायकलने जात होता. कातोडीपाडा येथे मलनिस्सारण वाहिनीचे बांधकाम साहित्य उघड्यावर पडले आहे. रस्त्यावरील खडीवरून सायकल घसरल्याने विवेक उघड्यावरील लोखंडी सळ्यांवर पडला. या अपघातात विवेकच्या डोळ्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

ही बातमी वाचली का? परदेशवारी केलेल्यांवर 14 दिवस देखरेख

तातडीने त्याला नजीकच्या मुक्ताबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याला पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The iron rod of construction that entered the eyes of the tenth student in ghatkopar!