Mumbai : पतीने आपला वेळ आणि पैसा आईला दिला तर तो काही घरगुती हिंसाचार ठरत नाही; सत्र न्यायालयाने पत्नीला सुनावले

पती विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या पत्नीला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. पतीने आपला वेळ आणि पैसा आईला दिला तर तो काही घरगुती हिंसाचार ठरत नाही असे स्पष्ट करत न्या. आशिष अयाचित यांनी पत्नीचा अर्ज फेटाळून लावला.
It is not domestic violence if  husband gives his time and money to mother sessions court wife petition
It is not domestic violence if husband gives his time and money to mother sessions court wife petitionSakal

मुंबई : पती विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या पत्नीला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. पतीने आपला वेळ आणि पैसा आईला दिला तर तो काही घरगुती हिंसाचार ठरत नाही असे स्पष्ट करत न्या. आशिष अयाचित यांनी पत्नीचा अर्ज फेटाळून लावला.

मंत्रालयात काम करणाऱ्या महिलेने पती विरोधात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तिचा पती वारंवार आपल्या आईला आर्थिक मदत करत असून आईसोबत वेळ घालवतो पतीच्या या कृत्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्ष होत आहे.

इतकेच नव्हे तर मुलगी १८ वर्षापेक्षा जास्त असताना मुलीच्या देखभालीसाठी अधिक खर्च देण्याची मागणीही महिलेने केली होती. सत्र न्यायालयाचे न्या. आशिष अयाचित यांच्या समोर झालेल्या सुनावणीला न्यायालयाने महिलेने केलेला हा दावा फेटाळून लावला. या खटल्यात अर्जदाराने केलेल्या दाव्यात अस्पष्टता आणि सत्याचा अभाव असल्याचे निदर्शनास येत असून

पतीने आपल्या आईची घेतलेली काळजी आणि सासरच्या मंडळीकडून होणारी छळवणूक या अर्जदाराच्या आरोपात तथ्य आढळून येत नाही असे निरीक्षण नोंदवत महिलेची मागणी फेटाळली इतकेच नव्हे तर कागदपत्रे आणि पुराव्यांची दखल घेत दंडाधिकारी न्यायालयाने ३ हजार रुपये देखभाल खर्च पतीने पत्नीला देण्याचे आदेशही सत्र न्यायालयाने रद्द केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com