
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्याजवळ कबुतरांना खायला घालण्यावरील बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाज अधिक आक्रमक झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता, दादरमधील कबुतरखान्याजवळ जैन समाजातील काही लोकांनी कबुतरांना खायला घातले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यांना रोखले. यामुळे कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध १३ तारखेपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा समुदायाने दिला आहे.