esakal | जेईईचा निकाल जाहीर ; 100 पर्सेंटाइल घेण्यात राज्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

जेईईचा निकाल जाहीर ; 100 पर्सेंटाइल घेण्यात राज्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जेईई-मेन (JEE) आडवान्स इंजिनीअरिंग (Engineering) प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत जेईई (JEE) पात्र ठरण्यासाइी कट-ऑफ (Cut-off) ८७.८९९२२४१ इतका निश्चित झाला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. तर यावेळी सर्व श्रेणींमध्ये कट ऑफ कमी झाला आहे.

देशात तब्बल यावेळी ४४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले असून त्यात राज्यातील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये मुंबईतील अथर्व तांबट, सौरभ कुलकर्णी आणि अमेय देशमुख, स्नेहदीप गायेन, गार्गी बक्षी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यासोबतच एनटीएने मे २०२१ मध्ये प्रस्तावित पण कोरोनामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या चौथ्या टप्प्यातील जेईई मेन २०२१ मध्ये उपस्थित झालेल्या उमेदवारांची ऑल इंडिया रॅंक आणि परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. जेईई-मेन इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. यामध्ये एकूण ४४ उमेदवारांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. एनटीएने जाहीर केलेल्या सुचनेनुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात राज्यातील ५ विद्यार्थ्यांचा तर ४ आंध्र प्रदेश, २ तेलंगणा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ उमेदवार आहेत.

हेही वाचा: Engineers Day : अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे सोलापुरात जलक्रांती!

जेईई आडवान्स मेनचे आयोजन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी आयोजित केली जाते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई उपस्थित राहू शकतात. जेईई आडवान्स मेनचे चौथे सत्र २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र ४ मध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची समीक्षा सोपी होती. यंदा देशातील ३३४ शहरात ९२५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

दरम्यान, आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. जेईई अॅडव्हान्स निकालानंतर आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड टेस्ट (एएटी) घेण्यात येईल. आयआयटीमधील आर्किटेक्चर प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी जेईई आडवान्स एएटी परीक्षा घेण्यात येते. १५ ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे.

loading image
go to top