धक्कादायक ! मुलीच्या दागिन्यांनी घेतला आईचा जीव...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मुंबई - दागिन्यांची आवड आपल्या प्रत्येकालाच असते. विषेशकरून महिलांसाठी दागदागिने म्हणजेच त्यांचा सॉफ्ट कॉर्नर. अशात दागिन्यांवरून अनेकदा घराघरात भांडणं देखील होतात. अशाच दागिन्यांच्या भांडणावरून एका आईचा मृत्यू झालाय.

मुंबईतील अंधेरीतील लोखंडवाला परिसरात माय-लेकीचं दागिन्यांवरून कड्याक्याचं भांडण झालं आणि वाद विकोपाला गेला. या भांडणावरून प्रकरण थेट आत्महत्येवर गेलं. ज्यामध्ये या आईचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 

मोठी बातमी - आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

काय आहे प्रकरण ? 

काल संध्याकाळी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्लेक्समध्ये राहणाऱ्या प्रिया सागर (मुलगी) आणि कमल (आई) यांच्यात वाद झाला. मुलीचे काही दागिने मिळत नसल्याने तिने आईकडे तिच्या दागिन्यांसंदर्भात विचारणा केली. आईने दागिने सोमवारपर्यंत परत देईन असं सांगितलं. याच कारणावरून घरात वादाची ठिणगी पडली आणि दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणानंतर प्रिया सागर म्हणजेच मुलीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान प्रियाच्या वडलांनी प्रियाला कोकिलाबेन  रुग्णालयात दाखल केलं.

मोठी बातमी -  तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

काल संध्याकाळपासून भांडणानंतर कमल म्हणजेच प्रियाची आई गायब असल्याने घरातील नोकराने शोध घेण्यास सुरवात केली. यादरम्यान आई कमलने घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  याप्रकरणी मुंबई पोलिस आता पुढील तपास करताय. 

jewelry of daughter took life of mother but how read full story here

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewellery of daughter took life of mother but how read full story here