esakal | ट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...

ट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य जनतेमध्ये याची जनजागृती व्हावी यासाठी जिओ आणि बिएसएनएल या कंपन्यांनी हॅलो टोनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस होण्याचे लक्षण आणि त्यापासून वाचण्यासाठी जनजागृती केली जात आहे. 

राज्यात काही संशयीत व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहे. तर बाहेर देशातून विमानमार्गाने येणाऱ्या प्रवाशांची तपासनी केली जात आहे. रेल्वे मंत्रालय, एसटी महामंडळाने यासंदर्भात दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे. त्यातच राज्यासह देशभरातील सामान्य माणसांपर्यंत पोहचण्याचे एकमात्र माध्यम असलेल्या मोबाईलद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

मोठी बातमी -  'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...

जिओ, बिएसएनएल कंपनीच्या क्रमांकावरून फोन केल्यास समोरच्या व्यक्तीला फोन लागल्यानंतर एक म्हातारा खोकलतांना आवाज येतो आहे. त्यानंतर कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या असतात. त्या उपाययोजना सांगून टोल फ्री क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन सुद्धा केले जात आहे. 

श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तिशी संपर्क ठेवतांना संसर्ग न होण्याची काळजी घ्या, वेळोवेळी व जेवणापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे, नाक डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नका, शिंकताना खोकलतांना नाकातोंडावर रूमाल ठेवा, हस्तांदोलन टाळावे, अर्धवट शिजलेले कच्चे अन्न खाऊ नयेत, जंगली आणि पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा अशा सुचना कॉल केल्यानंतर ऐकायला येत आहे. असे लक्षण आढळ्यास अधिक माहितीसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या 01123978046 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. 

मोठी बातमी - महावितरणच्या इतिहासातील सर्वात दुर्मिळ चोरी, वाचाल तर...

नेहमीप्रमाणे सकाळी मित्राला जिओ क्रमांकावरून जिओ नंबरवर फोन केला तर कुणीतरी म्हातारा माणूस खोकण्याचा आवाज येत होता. त्यानंतर गंभीरतेने ऐकल्यास त्यानंतर कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती संदेश ऐकायला मिळाला, त्यामूळे कोरोना व्हायरस संदर्भातील महत्वपुर्ण माहिती मिळाली. - गौरव जाधव, नागरिक 

एकीकडे कोरोना व्हायरस संदर्भात टिव्ही, वृत्तपत्र, रेडीओ यासह सोशल माध्यमांवर सुद्धा उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या जात असतांना, खासगी वस्तु असलेल्या मोबाईल संदेशाद्वारे प्रत्येकवेळी कोरोना व्हायरस संदर्भातील जनजागृतीचा संदेश ऐकावा लागत असल्याने भिती वाटायला लागली आहे. - कपील उमरे, नागरिक  

jio and BSNL are playing saftey corona information as hello tunes