
मुंबई : जेजे या सरकारी रुग्णालयात भारत बायोटिकच्या कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारपर्यंत ४० जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याची जेजे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रूग्णालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसरा डोस घेण्यासाठी स्वयंसेवकांशी सल्लामसलत केली जात आहे. कारण, स्वयंसेवकांकडुन लसीचा डोस घेण्यासाठी कारणे दिली जात आहेत. शिवाय, रुग्णालयात पोहोचायला जास्त वेळ जात असल्याची कारणे दिली जात आहेत.
तिसर्या टप्प्यातील ट्रायल्सचा भाग म्हणून जेजे रुग्णालयाने २६ डिसेंबरपासून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, बुधवारी जवळपास ४० जणांना दुसरा डोस देण्यास आला आहे. दरम्यान, पहिला डोस ४२५ जणांना देण्यात आला आहे.
कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल किमान १००० स्वयंसेवकांवर केली जाणार होती. मात्र, स्वयंसेवकांचा डोस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला असून काही महिन्यांपूर्वी या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात झाली होती. त्यानंतर २६ डिसेंबरपासून स्वयंसेवकांना दुसरा डोस द्यायला सुरुवात झाली आहे. भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. मुंबईतील सायन आणि जेजे ही दोन रुग्णालये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी निवडले गेले आहेत. जवळपास 26,000 पेक्षा जास्त लोकांचा लसीकरणात समावेश केला जाणार आहे.
दोन्ही रुग्णालयांमधील मुख्य तपासनीसांनी असे म्हटले आहे की, लसीकरण झालेल्यांपैकी जवळपास 2 ते 3 टक्के -म्हणजेच "फारच कमी" स्वयंसेवकांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले आहेत. सर्वात प्रतिकूल परिणाम 24 तासांच्या आत दिसून आले आणि ज्या ठिकाणी लस दिली गेली त्या भागात ताप आणि वेदना जाणवल्या. बाकी कोणताच दुष्परिणाम दिसून आलेला नाही.
जेजे रुग्णालयात २६ डिसेंबरपासून दुसऱ्या डोस देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास ४० स्वयंसेवकाना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण ४२५ स्वयंसेवकांना पहिला डोस दिला गेला आहे.
डॉ. दिनेश धोडी,
कोव्हॅक्सिन समन्वयक, जे. जे. रुग्णालय
JJ Hospital begins administering second dose of covacin vaccine A second dose to 40 people so far
------------------------------------------
( संपादन -- तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.