JN.1 Covid 19 variant: JN.1 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आढळत आहेत 'ही' लक्षणे; तात्काळ करा डॉक्टरांना संपर्क

चार ते पाच दिवसांत रुग्‍ण बरे; सेल्फ चाचणीतही अनेक पॉझिटिव्ह
Mumbai Covid JN.1
Mumbai Covid JN.1sakal

मुंबईत आढळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांमध्ये साध्या तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. सर्दी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लक्षणे पाहून डॉक्टर चाचण्यांचा सल्ला देत आहेत. काही रुग्ण घरीच स्वत:ची चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत.

कोरोनाचा नवा ‘जेएन.१’ व्हेरियंट सापडल्‍यानंतर सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या घाबरण्यासारखी स्थिती नसली तरी, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येत्या काही आठवड्यांत प्रकरणांमध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Covid JN.1
JN.1 Covid : हिवाळा सुरू झाल्यावर का वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

रुग्ण तीन ते पाच दिवसांत बरे होतात; परंतु अशक्तपणा दूर होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागतो, असे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाचे अंतर्गत औषध विशेषज्ञ डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले. आमच्याकडे उपचारासाठी आलेल्‍या एकाही रुग्‍णाला रुग्‍णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, असे वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. बेहराम पार्डीवाला म्‍हणाले. अलीकडेच आलेला एक रुग्‍ण अवघ्‍या एका दिवसात बरा झाला, असे हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ डॉ. जॉय चक्रवर्ती यांनी सांगितले.

राज्यात २८, तर मुंबईत १३ रुग्ण

सोमवारी राज्यात १,१६२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २८ रुग्णांना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. मुंबईत ५२ जणांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १३ रुग्‍ण पॉझिटिव्ह आढळले. सध्या मुंबईचा सकारात्मकता दर १०.४ टक्के आहे. राज्याच्या सकारात्मकतेच्या दरापेक्षा तो अधिक आहे.

Mumbai Covid JN.1
JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?

मुंबईत नऊ रुग्ण दाखल

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १६८ वर पोहोचली असून त्यांपैकी ७६ मुंबईतील आहेत. सध्या राज्यात एकूण ११ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी नऊ मुंबईतील आहेत. मुंबईतील ५५ टक्के रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्‍य विभागाने दिली.

बूस्टर डोस घ्‍यायचा राहिला असल्‍यास तातडीने घ्‍यावा. मॉल, थिएटर, पार्क वा कार्यालयात मास्क वापरणे आवश्यक आहे. लक्षणे आढळल्यास तपासणी करा.

- डॉ. बेहराम पार्डीवाला

संचालक, वोक्हार्ट हॉस्पिटल

Mumbai Covid JN.1
JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?

केरळसह मुंबईतही ‘जेएन.१’चे रुग्‍ण आढळत आहेत. सर्दी, खोकला आणि ताप असल्‍यास मास्क लावणे आवश्‍यक आहे.

- डॉ. गौतम भन्साळी,

समन्वयक, खासगी कोविड आणि सल्लागार फिजिशियन, बॉम्बे हॉस्पिटल

मुंबईत आढळणारे सर्वाधिक रुग्ण खासगी रुग्णालयातील असल्याची माहिती समोर येत आहे. पॉझिटिव्ह केसेसबद्दलची माहिती पालिकेला देण्याची सूचना रुग्‍णालयांना देण्यात आली आहे.

डॉ. दक्षा शहा,

कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

Mumbai Covid JN.1
COVID 19 Jn.1 Variant : जिल्ह्यात ‘जेएन 1’ कोरोनाचा रुग्ण नाही; कोरोना लक्षणे दिसताच तपासणी करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com