
Mumbai: जेएनपीए लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात निरोप देण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षापासून जेएनपीए बंदरातून मुंबईसाठी अद्ययावत स्पीड बोट धावणार आहे. या प्रदूषणविरहित स्पीड बोटीमुळे ३५-४० मिनिटांत प्रवाशांना उरणपासून मुंबईत पोहोचता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जलप्रवाशांना होणार आहे.
जेएनपीए बंदरातून मुंबईला ये-जा करण्यासाठी लाकडी बोटींचा वापर करण्यात येतो. या सागरी व्यवस्थेचा वापर जेएनपीएचे कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि जेएनपीए कर्मचारी, अधिकारीवर्गाचे कौटुंबिक सदस्य, पोर्ट युजर्स इत्यादी करतात. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी किमान १६ ते २० फेऱ्या जेएनपीए बंदर ते मुंबई असा करतात. यासाठी जेएनपीएला दर महिन्याला १९ लाख ६८ हजार खर्च येतो. वर्षभरापूर्वी उरण रेल्वे सुरू झाली आहे.