esakal | मुंबईतील जॉगिंग ट्रॅक खुले करावेत; भाजप खासदाराचे केंद्र सरकारला पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

 मुंबईतील जॉगिंग ट्रॅक खुले करावेत; भाजप खासदाराचे केंद्र सरकारला पत्र

राज्य सरकारने जॉगिंगला संमती दिली असली तरी अद्याप संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे कॉलनीतील जॉगिंग ट्रॅक व्यायामपटूंसाठी खुले केले नाहीत, अशी तक्रार उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे. 

मुंबईतील जॉगिंग ट्रॅक खुले करावेत; भाजप खासदाराचे केंद्र सरकारला पत्र

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : राज्य सरकारने जॉगिंगला संमती दिली असली तरी अद्याप संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे कॉलनीतील जॉगिंग ट्रॅक व्यायामपटूंसाठी खुले केले नाहीत, अशी तक्रार उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक; वाचा सविस्तर बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर गेल्या चार-पाच महिन्यांपासून हे उद्यानही व्यायामपटूंना बंद केले होते. महाविकास आघाडी सरकारने अनलॉकमध्ये जॉगिंगला आणि मोकळ्यावरील व्यायामाला संमती दिली आहे; मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे कॉलनीतील जॉगिंग ट्रॅक अजूनही व्यायामपटूंसाठी अधिकृतपणे बंद आहेत. तेथील रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी त्याचा वापर करता येतो; मात्र तेथे बाहेरील व्यायामपटू व रहिवासी येऊ शकत नाहीत. तेथील सुरक्षा रक्षक बाहेरील रहिवाशांना अडवतात. यासंदर्भात शेट्टी यांनी यापूर्वी समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकून हे जॉगिंग ट्रॅक उघडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले होते; मात्र आता शेट्टी यांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना पत्र लिहिले आहे. 

ही बातमी वाचली का? क्या बात! 96 वर्षांच्या आजीबाईंची २२ दिवसात कोरोनावर मात

मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांनाही पत्र
केंद्र सरकारने आता अनलॉक जाहीर करताना राज्य सरकारांनी केंद्राच्या संमतीखेरीज नवे स्थानिक लॉकडाऊन जाहीर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही या दोन ठिकाणचे जॉगिंग ट्रॅक सरकारने बंद केल्याने ते निदान व्यायामपटूंसाठी सकाळी व संध्याकाळी काही वेळासाठी उघडण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, यासंदर्भात शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांना पत्र पाठवून हवेतर सुयोग्य निर्बंधांसह या दोन ठिकाणांवरील जॉगिंग ट्रॅक खुले करण्याची मागणी केली आहे. 
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)