ड्युटी जॉईन करायच्या आधी बेस्ट चालकांची प्राथमिक तपासणी केली जावी

ड्युटी जॉईन करायच्या आधी बेस्ट चालकांची प्राथमिक तपासणी केली जावी

मुंबई : बेस्ट बस चालकांच्या आरोग्याबरोबरच प्रवाशांच्या जिवाचा प्रश्‍न पुन्हा अधोरेखीत झाला आहे. रेल्वेच्या मोटरमन प्रमाणे बेस्टच्या चालकांची ड्युटी जॉईन करताना रोज प्राथमिक तपासणी करणे बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे मागणी आता पुढे येऊ लागली आहे. मात्र, बेस्टच्या चालकांसह इतर कर्मचाऱ्यांचही नियमीत तपासणी केली जात असून त्यांना निरोगी राहाण्याबाबत नेहमीच मार्गदर्शन केले जाते असे बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

चेंबूरहून घाटकाेपरला येणाऱ्या 381 क्रमांकाचे बेस्ट बस चालक हरिदास पाटील यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. मात्र, पाटील यांनी प्रसंगावधान राखून बेस्टचे कमीत कमी नुकसान होईल हे पाहून बस नियंत्रीत ठेवली. बसची धडक झाली असली तरी कोणही जखमी झालेले नाही. मात्र, तरीही बेस्ट चालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

40 ते 50 प्रवाशांना वाहून नेणाऱ्या बसच्या चालकाची ड्युटी जॉईन करण्यापुर्वी तपासणी करणे गरजेचे आहे. असे पालिकेतील विरोधी पक्षनेते, बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी नमुद केले. ड्युटी जॉईन करण्यापुर्वी रक्तदाब, शरीरातील ऑक्सीजनची पातळी मोजता येऊ शकते. यासाठी डॉक्टरच हजर राहाण्याची गरज नसून वरीष्ट कर्मचाऱ्यांकडूनही नोंद घेतली जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले. रेल्वेमध्ये मोटरमनची रोज प्राथमिक तपासणी होत असेल तर बेस्ट बस चालकाची तपासणी करण्यास काय हरकत असेही त्यांनी नमुद केले.

बेस्टचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ.अनिल सिंघल यांनी कर्मचाऱ्यांची नियमीत तपासणी होत असल्याचे सांगितले. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांना हृदयविकाराची शक्यता आहे   त्यांच्यावर उपचार करण्याबरोबरच त्यांना जिवनशैलीत बदल करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. याचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांनाही झाला असल्याचा त्यांनी सांगितले.

पाटील झाले होते व्यवस मुक्त

बेस्ट उपक्रमाकडून कर्मचाऱ्यांच्या व्यसनमुक्तीचे अभियान राबवले जाते. अपघात झालेल्या बसचे चालक हरीदास पाटील यांनी या अभियानाला प्रतिसाद देत ते व्यसनमुक्त झाले होते. दोन वर्षांपासून ते व्यसनमुक्त आहेत. हे या अभियानाचे यश आहे. असे डॉ.सिंघल सांगतात. पाटील यांची प्रकृती स्थीर असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.आता त्यांना कोणताही धोका नसल्याचे डॉ.सिंघल यांनी सांगितले. व्यसनमुक्तीमुळे पाटील या धक्क्यातून बाहेर आले आहे. ह्रद्यविकाराचे प्रमुख कारण तंबाखुचे व्यसन मानले जाते. त्यामुळे या व्यवसनापासून कर्मचाऱ्यांना लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही त्यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

before joining duty all best drivers must go through medical check up

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com