पत्रकार अतुल आंबेरकर यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

गेल्या बऱ्याच वर्षांपासून अतुल आंबेरकर हे एका मोठ्या मराठी वृत्तपत्रांमध्ये मुख्य उपसंपादकपदी कार्यरत होते. अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती. 

मुंबई : वरिष्ठ पत्रकार अतुल आंबेरकर यांचं अकस्मात निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांचं निधन झालं असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून अतुल आंबेरकर हे एका मोठ्या मराठी वृत्तपत्रांमध्ये मुख्य उपसंपादकपदी कार्यरत होते. अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती. 

हे ही वाचा वयाच्या ९५ व्या वर्षी जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळाने निधन

गोरेगावच्या सामना सोसायटीत ते राहत होते. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणेच त्यांनी वर्क फ्रॉम सुरु केलं. संध्याकाळपर्यंत रोजच्या कामबाबत त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधला. तसंच त्यांचं मॅसेजद्वारेही संभाषण सुरु होतं. मात्र त्यांनी रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यांना तात्काळ जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. 

मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर 

प्रस्थापित माध्यमांमध्ये काम करीत असताना, कोणत्या बातमीचं किती वजन आहे याचं त्यांना अचूक ज्ञान होतं. हेच त्यांच्या कामाबाबतचं प्रमुख वैशिष्टयं होतं. ऑटो सेक्टरमधील नवनवीन माहिती जाणून घेणं, त्यातल्याच नव्या ट्रेंडचा अभ्यास करणे हे त्यांच्या सर्वात आवडीचे विषय होते. या विषयांवर ते लिखाणही करायचे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांवरील प्रासंगिक लिखाणही ते करायचे. 

ही हे वाचाज्येष्ठ साहित्यिक यशवंत रांजणकर यांचे निधन

आंबेरकर यांनी आपलं शालेय शिक्षण डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरात, तर कॉलेज शिक्षण पेंढारकर महाविद्यालयात पूर्ण केलं. अतुल हे 'सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक सुशील आंबेरकर यांचे बंधू होते.

Journalist Atul Amberkar passes away read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist Atul Amberkar passes away read full story