
-नितीन बिनेकर
मुंबई : आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राज्यभरातून कार्यकर्ते दाखल झाले आहेत. येथील गर्दीत अचानक हलगीचा ठेका घुमतो. कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. ही हलगी वाजवतोय मेहबूब बाबा शेख. आईचे छत्र गमावलेला, पण गावकऱ्यांच्या आधारे जगणाऱ्या बीडच्या सोनवळा गावातील हा मुस्लिम तरुण म्हणतोय, ‘‘मराठा समाजानं मला जगवलं, आज मी त्यांच्या लढ्यासाठी वाजवतोय.’’