देवदूत नव्हे 'तो' तर जणू देवच..  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

नुकताच नवी मुंबईतील ऐरोलीत एका अशा व्यक्तीचा सन्मान करण्यात आला ज्यामुळे एक दोन नव्हे तर हजारो लोकांचे प्राण वाचलेत. 

नुकताच नवी मुंबईतील ऐरोलीत एका अशा व्यक्तीचा सन्मान करण्यात आला ज्यामुळे एक दोन नव्हे तर हजारो लोकांचे प्राण वाचलेत. नरेंद्र देविदास चौधरी हे त्यादिवशी नसते, तर कदाचित एक मोठी वाईट बातमी आपल्यासमोर आली असती. 

मोठी बातमी - आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..

मध्य रेल्वेमध्ये मोटारमन म्हणून काम करणारे नरेंद्र देविदास चौधरी हे हजारो लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूपणे पोहचविण्याचे काम करतात. परंतु तो दिवस वेगळा होता. घटना घडली असती नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर महिन्यात सायंकाळी पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकल ट्रेन चालवत असताना कुर्ला ते चुनाभट्टीच्या दरम्यान चौधरी यांना रेल्वे रुळावर एक लोखंडी रॉड असल्याचं निदर्शनात आलं. तात्काळ त्यांनी आपत्कालीन ब्रेक वापरून गाडी थांबवली. त्यानंतर त्वरित आपल्या गाडीचे फ्लॅश लाईट सुरू करून समोरून येणाऱ्या गाडीच्या चालकास देखील सतर्क करून होणारी संभाव्य  अप्रिय घटना टाळली.

मोठी बातमी -   ..'ते' करायचे हे काम; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

ऐन गर्दीच्या वेळी चौधरी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला. चौधरी यांनी हजारो नागरिकांचे प्राण वाचले. यामुळे मुंबई विभागीय कार्यालयाने त्यांचा गौरव केलाच आहे परंतु त्याच बरोबर केंद्र शासनाने देखील चौधरी यांच्या कामाची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. 

मोठी बातमी -  'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाबाबत भाजपने घेतला निर्णय, काँग्रेस म्हणतंय..

सिनिअर सिटीजन हेल्थ केअर फाऊंडेशन ऐरोली ही ऐक सेवाभावी संस्था असून समाजातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांचा सन्मान ही संस्था करत असते. नुकताच ऐरोलीमध्ये राहत असणाऱ्या मध्य रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून काम करणाऱ्या नरेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिनिअर सिटीजन हेल्थ केअर फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष बबनराव पाटणकर आणि उपाध्यक्ष भारत म्हात्रे, खजिनदार शांताराम विशे संस्थेचे पदाधिकारी कार्यकारणी सदस्य यांनी नरेंद्र देविदास चौधरी यांना फुलगुच्छ देऊन सन्मानित केले. 

WebTitle : just because of narendra chaudhari thousands of people saved their life in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: just because of narendra chaudhari thousands of people saved their life in mumbai