जेष्ठ न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचा राजीनामा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी शुक्रवारी (ता. १४) पदाचा राजीनामा दिला. व्यक्तिगत आणि कौटुंबिक कारणांमुळे महाराष्ट्राबाहेर बदली घेऊ शकत नाही. त्यामुळे राजीनामा दिला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे न्यायालयातच त्यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली.

नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप असं करतंय प्लॅनिंग

मुंबई उच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती असलेले न्या. सत्यरंजन धर्माधिकारी (६०) यांना अन्य एका राज्याचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय झाला आहे; परंतु मुंबई सोडण्याची आपली इच्छा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावर नियुक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्णत: वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांवरून राजीनामा दिला, असे त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. 

कोरोना रुग्णांमध्ये अडकलेल्या तिची मदतीची हाक

शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर ॲड्‌. मॅथ्यू नेदुमपारा यांनी एका प्रकरणाचा उल्लेख खंडपीठापुढे केला. त्यावेळी न्या. धर्माधिकारी यांनी सांगितले, की आज माझ्या कामकाजाचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे नवे प्रकरण दाखल करू नका. न्या. धर्माधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे वकील वर्गातही खळबळ उडाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: justice Satyarajan Dharmadhikari resigns!