भीषण ! परदेशात वापरलेले N95 मास्क धुवून विक्रीसाठी आणलेत भिवंडीच्या गोदामात

bhiwandi masks
bhiwandi masks

मुंबई : कोरोना व्हायरस आता संपूर्ण जगात सक्रिय झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी एन-९५ मास्क वापरायला हवं असा सांगण्यात येत होतं. संपूर्ण जगात आतापर्यंत लाखो लोकांनी N95 मास्क वापरले आहेत. मात्र हे वापरलेले मास्क आता मुंबईत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलायं. जगभरात लोकांनी वापरलेले मास्क भारतात मागवून त्यांना धुवून परत विक्रीसाठी ठेवण्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतल्या गोदाम मालकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे.

नक्की काय आहे प्रकरण:

भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार इलेक्ट्रॉनिक माल आणि परदेशात वापरलेले मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहेत. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्यामुळे परदेशातून वापरलेले मास्क या गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीत गोदाम मालक करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. भिवंडी पोलिसांनी पंचायत समिती आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन याबद्दल तपासणी केली. भिवंडी तालुक्यातल्या वळगाव इथल्या पारसनाथ कंपाऊंड गोदामातला माल पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतल्या मुंबई मनपा पाणी पुरवठा पाईपलाईन शेजारच्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात मास्क फेकून दिल्याचं पोलिसांना आढळून आलं होतं. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं हे मास्क  फेकून दिल्याचं उघडकीस आलं होतं. यावर पोलिसांनी लगेच तपास सुरु केला.

गोदाम मालकाच्या सांगण्यावरून इम्रान शेख या कामगारानं  हे वापरलेले मास्क फेकून दिल्याचं चौकशीत उघड झालं. इम्रान याला नारपोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजार केलं. कोर्टानं  त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीये.  

Used N 95 masks came to mumbai from foreign for sale what happened after that read full story 
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com