Chhota Rajan : काय सांगता? अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त होणार कबड्डी स्पर्धा ! बॅनर व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Underworld don Chhota Rajan

Chhota Rajan : काय सांगता? अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त होणार कबड्डी स्पर्धा ! बॅनर व्हायरल

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईक कबड्डीची स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धचे बॅनर जागोजागी लावण्यात आले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही स्पर्धा मालाडच्या तानाजी नगर येथील कुरार व्हिलेज गणेश मैदानावर होणार आहे. (Underworld don Chhota Rajan)

या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कबड्डी स्पर्धा १४ आणि १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हा बॅनर सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी लावला आहे. दरम्यान या प्रकरणी सहा जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात एका आयोजकाचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: Brijbhushan Singh : पुण्यात येऊन बृजभूषण सिंह यांचे राज ठाकरेंवर वक्तव्य! म्हणाले, "कधीकाळी महाराष्ट्रात..."

यापूर्वी २०२० मध्ये देखील छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे समोर आले होते. लोकांनी ठाण्यात बॅनर लावले होते. यावेळी पोलिसांनी कारवाई केली होती.

हेही वाचा: Air India : सीटवर लघवी केल्याच्या आरोपाला पीडितेचं सडेतोड उत्तर; मुंबईच्या मिश्राबद्दल सांगितली मोठी गोष्ट

गेल्यावर्षी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छोटा राजनचे वकील ॲड. तुषार खंदारे यांनी याची माहिती दिली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने याबाबत निकाल दिला होता.  

हेही वाचा: Solapur News :राऊतांचे राजन पाटलांना थेट भाजप प्रवेशाचे निमंत्रण

२९ जुलै २००९ रोजी छोटा शकील गँगचे गुंड असिफ दाढी आणि शकील मोडक या दोघांची जे जे सिग्नलजवळ हत्या करण्यात आली होती. छोटा राजन याच्या गुंडांनी हे हत्याकांड घडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या हत्याकांडात छोटा राजनलाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, पुराव्यांअभावी विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायधीश अरविंद वानखेडे यांनी छोटा राजनला डबल मर्डरच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते.

हेही वाचा: Pathaan: शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर झळकणार बुर्ज खलिफावर

टॅग्स :Gangster chota Rajan