Pathaan: शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर झळकणार बुर्ज खलिफावर

शाहरुख खान सध्या इंटरनॅशनल लीग T20 साठी मिडल इस्टमध्ये आहे. 'पठाण'चा ट्रेलर जेव्हा बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित होईल तेव्हा तो तेथे उपस्थित असेल.
shahrukh khan
shahrukh khanSakal

शाहरुख खान-दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'पठाण'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान सध्या इंटरनॅशनल लीग T20 साठी मिडल इस्टमध्ये आहे. 'पठाण'चा ट्रेलर जेव्हा बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित होईल तेव्हा तो तिथे उपस्थित असेल.

इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसोझा म्हणाले, “पठाण हा आपल्या काळातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि असा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा सर्वात मोठा मार्ग स्वीकारला पाहिजे. दुबईच्या बुर्ज खलिफा येथे शाहरुख खान आणि पठाण यांचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

तो पुढे म्हणाला, “शाहरुख खान, जो सध्या आंतरराष्ट्रीय लीग T20 साठी UAE मध्ये आहे, मोठ्या सोहळ्यासाठी तिथे येणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. शाहरुखचे UAE मध्ये खूप चाहते आहेत".

सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 10 जानेवारीला रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

shahrukh khan
Akshaya-Hardik अक्षया होणार आता 'होममिस्टर'! 'राणादा आणि अंजलीची' पहिली मकर संक्रांत दणक्यात...

जवळपास अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका हे गुप्तहेर म्हणून शत्रूविरुद्ध लढताना दिसत आहेत. जॉन अब्राहम त्या शत्रूच्या व्यक्तिरेखेत दाखवला आहे, जो भारतावर हल्ला करण्याची रणनीती बनवत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त शाहरुख निर्माता राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो 'जवान'मध्येही दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com